Wadwal Nagnath

वर्षभरातील श्रींचे उत्सव

वडवाळ येथे येणाऱ्या भाविकांना केवळ अमावस्या, यात्रा याविषयी संक्षिप्त माहिती असल्यामुळे इतरवेळी देखील विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात, याची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने या सदरामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. चैत्र महिन्याला नागेश संप्रदायामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चैत्र महिन्यापासूनच मराठी वर्षास प्रारंभ होतो. या महिन्यापासूनच क्रमवार होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची ही माहिती.

चैत्र महिना : गुढीपाडवा/पाडवा वाचन

March 30, 2025 गुढीपाडवा या दिवशी मंदिरात पाडवा वाचनाचा कार्यक्रम असतो. खर्गेमहाराज शिवपुजे व मोरे पाटील, धनवे पाटील या मानकऱ्यांच्या उपस्थितीत Read More

चैत्र पौर्णिमा : श्री नागनाथांची यात्रा पार्श्वभूमी

श्रीक्षेत्र वडवाळ येथील या यात्रेला १२ व्या शतकापासून प्रारंभ झाला. या दिवशीच श्रींच्या वार्षिक यात्रेला प्रारंभ होत असतो. Read More

तेल लावणे

चैत्र महिन्यातील पौर्णिमेस हनुमान जयंतीस ग्रामदैवत श्री नागनाथांच्या यात्रेस प्रारंभ होतो. हा यात्रेचा कार्यक्रम भक्त हेगरस यांचे वंशज सांगतात. Read More

'कळस' चढणे

श्रीक्षेत्र वडवळ येथील यात्रेची प्रथा या बाराव्या शतकापासून सुरू आहेत. श्रींच्या वार्षिक यात्रेमधील सर्व विधी, कार्यक्रम हे प्रथेनुसार व विशिष्ट क्रमाने Read More

पुजारी जेवू घालणे

श्री नागनाथ मंदिरातील पूजा-अर्चा, वर्षभरातील मंदिरातील विविध कार्यक्रम येथील पुजारी करीत असतात. सर्व पुजारी हे शिवपुजे घराण्यातील आहेत. Read More

खर्ग

श्रीक्षेत्र वडवाळ येथील यात्रेमधील हा दुसरा मुख्य सोहळा. हा दिवस चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थीचा असतो. Read More

गण

वडवळ येथील यात्रेतील हा तिसरा मुख्य सोहळा 'गण' या नावाने ओळखला जातो. चैत्र महिन्यातील कृ. सप्तमीच्या दिवशी हा सोहळा असतो. Read More

श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र मोहोळकडे प्रयाण

चैत्र महिन्यातील चैत्र कृ. अष्टमीचा हा दिवस होय. या दिवशी खर्गे महाराजांच्या घरी सर्व मानकरी, भाविक, ग्रामस्थ यांच्यासाठी दुपारी महाप्रसाद दिला जातो. Read More

तेल उतरविणे

चैत्र महिन्यातील चैत्र कृ. नवमीचा हा दिवस. यादिवशी दोन्ही खर्गेमहाराज व संतमंडळी पहाटे तेल उतरविण्याचा अभिषेक करतात. Read More

मोहोळ येथील यात्रा व वडवाळ येथील छत्री

श्रीक्षेत्र वडवाळ येथील यात्रेची सांगता झाल्यानंतर चैत्र अमावस्येला श्री क्षेत्र मोहोळ येथील श्रींच्या यात्रेस प्रारंभ होतो. Read More

श्रीक्षेत्र वडवाळ येथील छत्रीचे महात्म्य

श्रीक्षेत्र वडवाळ व श्रीक्षेत्र मोहोळ येथील यात्रेमध्ये प्रमुख सोहळ्यात खर्गेमहाराजांच्या मस्तकावर ही पांढरी छत्री असते. Read More

श्रावण

July 25, 2025 श्रावण मास हा शिवभक्तांच्या भक्तीचा अनोखा सोहळाच. प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक केला जातो. Read More

श्रीकृष्ण जयंती : गोपाळकृष्ण मंदिर

August 15, 2025 श्री नागनाथ मंदिराच्या दक्षिणेला सुरेख असे गोपाळकृष्ण मंदिर आहे. या मंदरामधील श्रीकृष्णाची मूर्ती नेत्रदीपक आहे. Read More

दसरा

October 2, 2025 या दिवशी पहाटे श्रींच्या मूर्तीना अभिषेक केला जातो. वडवाळ येथील दसरा हा सण जातीपातीचे सिमोल्लंघन करणारा सण. Read More

संकटहरणी पारायण

नागेश संप्रदायातील 'संकटहरणी' हा प्रासादिक ग्रंथ नागेशभक्त श्री अज्ञानसिद्ध यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ग्रंथ आहे. Read More

अज्ञानसिद्ध पंचमी

माघ शुद्ध पंचमी ह्या दिवशी श्री अज्ञानसिद्ध यांनी श्री नागनाथांच्या आदेशान्वयेच श्रीक्षेत्र नरंदे येथे संजीवन समाधी घेतली. Read More

महाशिवरात्री

February 15, 2026 ॐ नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय असा जयघोष करीत पहाटे श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक संपन्न होतो. Read More

महिमा श्री वडवाळसिद्ध नागनाथांचा

“महिमा श्री वडवाळसिद्ध नागनाथांचा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले हे पहिलेच पुस्तक. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्यू आर कोड असून याद्वारे भाविक लगेच स्कॅन करून या वेबसाईटवरील माहिती पाहू शकतात. देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त महेश कोटीवाले यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. वर्षभरातील श्रींचे उत्सव, येथील प्रथा, परंपरा आदीविषयी यामध्ये सचित्र माहिती देण्यात आली आहे हे पुस्तक वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात विक्रीस उपलब्ध असून याचे देणगी मूल्य नाममात्र ५० रु इतकी आहे.