Skip to main content

Wadwal Nagnath

सेवा / सुविधा

भाविकांच्या सेवेत श्रींचे मंदिर देखभाल व भाविकांना वेळोवेळी विविध सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने १९५४ साली श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीची स्थापना करण्यात आली. वर्षभरातील श्रींचे विविध धार्मिक उत्सव याप्रसंगी भाविकांची असणारी उपस्थिती याचा विचार करून त्याबाबतचे नियोजन पंचकमिटी करीत असते. पंचकमिटीने भक्तांसाठी उपलब्ध केलेल्या सेवा / सुविधांची माहिती खालीलप्रमाणे :

भक्त निवास

देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधले आहे. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे.



सांस्कृतिक सभागृह

देवस्थान पंचकमिटीने भक्त निवासाच्या पाठीमागे भव्य असे सांस्कृतिक सभागृह उभारले असून याठिकाणी आता लग्न सोहळे, साखरपुडा, नामकरण आदी उत्सव नाममात्र दरात साजरे करता येणार आहेत. सभागृहाजवळ भव्य असे प्रसादालय बांधण्यात आले आहे. याठिकाणी भोजन, अन्नदान केले जाते. त्यामुळे मुख्य मंदिरामध्ये आता लग्न व इतर सोहळे कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून भाविकांना केवळ दर्शनासाठी मंदिर उघडे असणार आहे.

रक्तदान शिबिर

सामाजिक बांधिलकी म्हणून दर महिन्याच्या अमावस्येला मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदात्याला मोफत दर्शन त्या दिवशी असते.






शैक्षणिक क्षेत्रात योगदान

देवस्थान पंचकमिटीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते या क्षेत्रातील सेवा सुखद अनुभव देणारी आहे