top of page
DSC_3167.JPG

रुद्राभिषेक :
श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीने भाविकांच्या मागणी व सूचनेचा विचार करून रुद्राभिषेकास प्रारंभ केला आहे. भाविकाने रु. ५०००/- (पाच हजार रुपये) देणगी दिल्यानंतर त्यांनी वर्षभरातील सांगितलेल्या कोणत्याही एका दिवशी हा रुद्राभिषेक केला जातो.
भाविकांचा अभिषेक :
वर्षभरात भाविक दर्शनाला येतात. त्यातील बरेच जण श्रींना अभिषेक करतात. गाभाऱ्यात अभिषेक करण्यासाठी जाणाऱ्या पुरुषांना प्रथम स्नान करून ओल्या कपड्यानेच गाभाच्यात जावे लागते. यावेळी अभिषेकाकरिता दूध, दही, केळी, मध, तूप, साखर, विड्याचे साहित्य खारीक, खोबरे, बदाम, हळद-कुंकू, पान-सुपारी, उदबत्ती, कापूर, नारळ, प्रसाद म्हणून पेढा, श्रीना दोन हार हे साहित्य लागते. जर भाविकांना सर्व साहित्य घेऊन येणे शक्य झाले नाही किंवा ऐनवेळी अभिषेक करावा असे वाटले तर संबंधित पुजारी यांना संपर्क करून भाविकांना अभिषेक करता येतो. जावळ काढणे :
श्री नागनाथ अनेक भक्तांचे कुलदैवत तर अनेक भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे, नवसाला पावणारे दैवत. श्रींच्या श्रद्धेपोटी अनेक कुटुंबिय आपल्या बालकांचे 'जावळ' काढण्यासाठी इथे आवर्जून येतात. हा त्यांच्या कुटुंबातील एक सुखद सोहळाच असतो. मंदिरातील पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हे जावळ काढले जाते.

​लागणारे आवश्यक साहित्य :
ब्लाऊज पीस, तांदूळ, खोबरे बाटी-१, पाच पाने, सुपारी-१, हळद-कुंकू, नारळ या साहित्याच्या सहाय्याने जावळ काढले जाते.

IMG-20210815-WA0050_edited.jpg
bottom of page