|| ना चिंता ना भय | श्री नागनाथ महाराज की जय ||
SHRI WADVALSIDDH NAGNATH DEVASTHAN PANCHCOMMITTEE
wadval,tq-mohol,dist-solapur 413213
श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटी
श्रीक्षेत्र वडवळ ता .मोहोळ जि . सोलापूर महाराष्ट्र-413213
"ज्यांना न घडे काशी त्यांनी यावे वडवाळाशी" असे स्थानमहात्म्य असलेल्या वडवळ येथील श्री नागनाथांचे भव्य व सुबक हेमाडपंथी मंदिर श्री एकलिंग तेली यांनी बांधले आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा मोठा असून इतर दोन दरवाजे लहान आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार (याला नागेशभक्त दिल्ली दरबार असे म्हणतात.) मधून भाविक आत येतात. सर्वप्रथम श्री एकलिंग तेली यांची संजीवन समाधी नजरेस पडते. त्यानंतर पुढे श्री नागनाथांचे गाभाऱ्यातील दर्शन होते. गाभाऱ्यात श्रींच्या दोन मूर्ती आहेत. (भाविक यांना थोरला देव व धाकटा देव असे संबोधतात.) याच गाभान्यात श्रींचे स्थान असून श्री नागनाथांनी आपले अवतार कार्य संपवण्यापूर्वी एक उजवे पाऊल याठिकाणी उमटवले आहे. श्रींच्या मूर्तीसमोर अखंड तेवत राहणाऱ्या दोन समई आहेत. यात्रा कालावधीत व इतर धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी या गाभान्यामध्ये विविध विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले जातात. श्रींची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. गाभान्याच्या बाहेर समोरील बाजूस गणमठ (यावर) यात्रेतील 'गण' या सोहळ्या दिवशी धार्मिक विधी पार पडत असतो. हे पवित्र स्थान असल्याने यावर कुणीही बसू नये अशी श्रद्धा आहे.) आहे. मंदिरातच देशमुखाची बावरी, घानम्मा देवीचे मंदिर, नागेशभक्त आलमखान यांच्या घोड्याची समाधी, संतकवी उद्भवचिद्धन यांची संजीवन समाधी, श्री बापूजी महाराजांची ओवरी आहे.मंदिराच्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करताच डाव्या हाताला मोठा नगारा आहे. श्रींच्या धार्मिक कार्यक्रमात याचे वादन केले जाते. या नगाऱ्याच्याच भिंतीशेजारी मंदिराच्या वर जाण्यासाठी अगदी एकावेळी एक व्यक्ती जाईल असा पायऱ्यांचा जिना आहे. वर गेल्यावर प्रथम चौघडा वादन करण्यासाठीची जागा दिसते. गावातील माने कुटुंबियांना हा चौघडा वादनाचा मान आहे. ही सेवा आजतागायत अखंड सुरू आहे. मंदिराचे शिखर घुमटाकार असून त्यावर विविध मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. घुमटाकार शिखराच्या आत जाण्यासाठी एक छोटा मार्ग आहे. या शिखरावर कळस आहे.