Skip to main content

Wadwal Nagnath

Our Festival

संकटहरणी पारायण

नागेश संप्रदायातील ‘संकटहरणी’ हा प्रासादिक ग्रंथ नागेशभक्त श्री अज्ञानसिद्ध यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ग्रंथ आहे. मार्गशीर्ष शुद्ध नवमी ह्या दिवशी पहाटे श्रीस अभिषेक केला जातो. त्यानंतर खर्ग तीर्थामध्ये ज्या ठिकाणी श्री अज्ञानसिद्ध यांनी तपश्चर्या केली होती त्या गुहेमध्ये जाऊन अभिषेक केला जातो. मंदिरात सर्वजण शुचिर्भूत होऊन येतात व ‘संकटहरणी’ या ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले जाते. त्यानंतर महाप्रसाद वाटप होतो. सायंकाळी मंदिरात श्री अज्ञानसिद्धांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.