Wadwal Nagnath

Our Festival

पुजारी जेवू घालणे

श्री नागनाथ मंदिरातील पूजा-अर्चा, वर्षभरातील मंदिरातील विविध कार्यक्रम येथील पुजारी करीत असतात. येथील सर्व पुजारी हे शिवपुजे घराण्यातील आहेत. या शिवपुजे यांची अनेक कुटुंबे गावात आहेत. त्यांना पूर्वी ठरल्याप्रमाणे नेमून दिलेल्या कालावधीत श्रींची पूजा करण्याचा मान आहे. चतुर्थी दिवशी (ज्या दिवशी श्रीक्षेत्र मोहोळहून श्रीक्षेत्र वडवाळ येथे श्री नागनाथांची पालखी येते) श्री नागनाथ मंदिरावर कळस चढवण्याचा कार्यक्रम सायं. ५ वाजता सुरू होतो. विधिवत कळस चढल्याबरोबर गावात खर्गे महाराज व शिवपुजे घराण्यातील पुजाऱ्यांना सर्व भाविक, ग्रामस्थ आपल्या घरी प्रसाद पुजारी जेवू घालतात. यामध्ये शिवपुजे कुटुंबातील आबालवृद्धांना बोलावले जाते. प्रत्येकाच्या घरी जाऊन तेथील प्रसाद घेतात. भाविक श्रद्धेने जेवू घातल्यानंतर त्यांच्या पाया पडून ऐच्छिक दक्षिणा देतात. भाविकांना आशीर्वाद देऊन पुजारी अन्य भक्तांच्या घरी प्रसाद घेण्यासाठी जातात. फक्त पुरुष पुजाऱ्यांना जेवू घातले जाते.