गुढीपाडवा या दिवशी मंदिरात पाडवा वाचनाचा कार्यक्रम असतो. खर्गेमहाराज शिवपुजे व मोरे पाटील, धनवे पाटील या मानकऱ्यांच्या उपस्थितीत मानकरी मोकाशी हे पंचांगाचे पूजन करून वर्षभरातील पर्जन्य, पीक आदीविषयी माहिती सांगतात. हे वाचन झाल्यानंतर साखरेच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते.