Wadwal Nagnath

Our Festival

अज्ञानसिद्ध पंचमी

माघ शुद्ध पंचमी ह्या दिवशी श्री अज्ञानसिद्ध यांनी श्री नागनाथांच्या आदेशान्वयेच श्रीक्षेत्र नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे संजीवन समाधी घेतली. या दिवशी मंदिरात पहाटे श्रींना अभिषेक केला जातो. श्री अज्ञानसिद्ध यांनी आपली ग्रंथरचना व तपसाधना खर्गतीर्थामधील गुहेमध्ये केली होती. याठिकाणी देखील अभिषेक व भजन केले जाते. नंतर प्रसाद वाटप करण्यात येतो. रात्री १० वा. खर्गतीर्थामध्ये वडवळ येथील सर्व संतमंडळी भजन करतात व त्याच दिवशी श्रीक्षेत्र नरंदे येथील यात्रेस रवाना होतात.