top of page

श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी:

श्रींचे मंदिर देखभाल व भाविकांना वेळोवेळी विविध सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने १९५४ साली श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीची स्थापना करण्यात आली. वर्षभरातील श्रींचे विविध धार्मिक उत्सव याप्रसंगी भाविकांची असणारी उपस्थिती याचा विचार करून त्याबाबतचे नियोजन पंचकमिटी करीत असते. नुकतेच देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे.
देवस्थान पंचकमिटीने इतर गोष्टींचा विचार करून भक्त निवासाच्या पाठीमागे भव्य असे बहुउद्देशीय सभागृह उभारले असून याठिकाणी आता लग्न सोहळे, साखरपुडा, नामकरण आदी उत्सव नाममात्र दरात साजरे करता येणार आहेत. त्यामुळे मुख्य मंदिरामध्ये आता लग्न व इतर सोहळे कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून भाविकांना केवळ दर्शनासाठी हे मंदिर उघडे असणार आहे.

bottom of page