हा अभिषेक भाविकांच्या इच्छे नुसार त्यांच्या दिलेल्या तारखे दिवशी वर्षातून फक्त एकदा केला जातो.
हा अभिषेक भाविकांच्या इच्छेनुसार त्यांनी सांगितलेल्या तारखे दिवशी प्रत्येक वर्षातून एकदा केला जातो. (प्रत्येक वर्षातून कोणत्याही एका दिवशी तिथिनुसार न करता कृपया तारीख द्यावी)
फक्त अमावस्या दिवशी श्री नागनाथ देवस्थान पंच कमिटीच्या कार्यालयात २५१ रू दक्षिणा घेवुन त्याचा श्रींना अभिषेक करून प्रसाद टपाल द्वारे घरपोच पाठविला जातो.
सर्व नागेश भक्तांच्या माहिती साठी.. श्रीक्षेत्र वडवळ नागनाथ मंदिरात श्रींचे अभिषेक वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत:
पहाटे ४ वा. — सकाळी ११.३० — सायं. ५.३० वा.
(टीप: फक्त पहाटे व सायंकाळी श्रींची मूर्ती उतरवून अभिषेक केला जातो. सकाळी ११.३० वा श्रींची मूर्ती न उतरविता अभिषेक केला जातो.)
अमावस्या दिवशी अभिषेक वेळ : पहाटे ३.३० वा. — सायं. ५.३० वा .
(टीप: अमावस्या दिवशी फक्त पहाटे व सायंकाळीच अभिषेक असतो.)
दैनंदिन अभिषेक दक्षिणा – रु. ३०१ (सर्व साहित्य पुज्याऱ्यांकडून दिले जाईल.)
पहाटे : श्रींचा रुद्राभिषेक व आरती
सुर्यास्तावेळी : आरती
“ज्यांना न घडे काशी त्यांनी यावे वडवाळाशी” असे स्थानमहात्म्य असलेल्या वडवळ येथील श्री नागनाथाचे भव्य व सुबक हेमाडपंथी मंदिर श्री एकलिंग तेली यांनी बांधले आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा मोठा असून इतर दोन दरवाजे लहान आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार (याला नागेशभक्त दिल्ली दरबार असे म्हणतात.) मधून भाविक आत येतात. सर्वप्रथम श्री एकलिंग तेली यांची संजीवन समाधी नजरेस पडते. त्यानंतर पुढे श्री नागनाथांचे गाभाऱ्यातील दर्शन होते. गाभाऱ्यात श्रींच्या दोन मूर्ती आहेत. (भाविक यांना थोरला देव व धाकटा देव असे संबोधतात.) याच गाभाऱ्यात श्रींचे स्थान असून श्री नागनाथांनी आपले अवतार कार्य संपवण्यापूर्वी तूरभूजीवर एक उजवे पाऊल याठिकाणी उमटवले आहे. ‘तूरभूज’ म्हणजे श्रींची मूर्ती ज्यावर ठेवली जाते ते स्थान. श्रींच्या मूर्तीसमोर अखंड तेवत राहणाऱ्या दोन समई आहेत.
वडवाळ येथे येणाऱ्या भाविकांना केवळ अमावस्या, यात्रा याविषयी संक्षिप्त माहिती असल्यामुळे इतरवेळी देखील विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात, याची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने या सदरामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. चैत्र महिन्याला नागेश संप्रदायामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चैत्र महिन्यापासूनच मराठी वर्षास प्रारंभ होतो. या महिन्यापासूनच क्रमवार होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची ही माहिती.

It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout. The point of using Lorem Ipsum is that it has a more-or-less normal distribution of letters, as opposed to using.

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since
“महिमा श्री वडवाळसिद्ध नागनाथांचा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले हे पहिलेच पुस्तक. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्यू आर कोड असून याद्वारे भाविक लगेच स्कॅन करून या वेबसाईटवरील माहिती पाहू शकतात. देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त महेश कोटीवाले यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. वर्षभरातील श्रींचे उत्सव,येथील प्रथा ,परंपरा आदीविषयी यामध्ये सचित्र माहिती देण्यात आली आहे हे पुस्तक वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात विक्रीस उपलब्ध असून याचे देणगी मूल्य नाममात्र ५० रु इतकी आहे. तसेच श्री नागेश लीलामृत हे पुस्तक १७५ रुपयांस तर दिनदर्शिका २०२५ नाममात्र १५ रुपयांत आणि इतर ग्रंथ व पुस्तके वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात विक्रीस उपलब्ध आहेत.
अगदी नावाप्रमाणेच… श्री नागेशांचे परमभक्त श्री अज्ञानसिद्ध यांनी “संकटहरणी” हा प्रासादिक ग्रंथ लिहिला हा पवित्र ग्रंथ असून याच ग्रंथाचे सुलभ वाचन व श्रवण व्हावे म्हणून श्री नागेश सांप्रदायिक सेवा मंडळ ,वडवळ ता मोहोळ यांच्या वतीने हा ऑडिओ तयार करण्यात आला नागेशभक्तांनी अवश्य याचे श्रवण करावे.
येथील सर्व सुविधा या आजवर भाविकांनी दिलेल्या रोख देणगी, वस्तूरुपाने केलेल्या मदतीवरच देणे शक्य झाले. यासाठी पुढील कार्याकरिता देखील ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल, वस्तूरुपाने मदत करावयाची असेल त्यांनी देवस्थान पंचकमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सदरहू देणगीदारांस ८० जी कलमान्वये आयकरातून सूट आहे.
संपर्क क्रमांक : ९०५०३८१९७७, ७७४१९९१६०६, ९६५७६६६५९७.
देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे. बुकिंगसाठी संपर्क क्रमांक : ९८५०३८१९७७, ७७४१९९१६०६, ९६५७६६६५९७.
खर्गतीर्थ, मुंगीचा धोंडा, तिमण्णा धनगर समाधी, वरदबसवराज, एकलिंग तेली समाधी, वटवृक्ष, गोपाळकृष्ण मंदिर यांसारख्या वडवळ येथील धार्मिक स्थळांचे महात्म्य आणि आख्यायिका विस्तृत स्वरूपात खालील लिंकवर श्री नागेशभक्तांसाठी उपलब्ध आहेत.